Shirwal News : दिवसाढवळ्या भररस्त्यात विनयभंग


शिरवळ पोलीस ॲक्शन मोडवर; आवळल्या तीन तासात मुसक्या

Shirwal News : माताभगिनीच्या अब्रूला दिवसाढवळ्या भररस्त्यात हात घालणाऱ्या नराधमाला शिरवळ पोलिसांनी तीन तासात शोधून काढत त्याला कायद्याचा बडगा दाखवला. शुभम दिलीप गुळमे (वय २४, सध्या रा. शिर्के कॉलनी, शिरवळ, मुळ रा. माळवाडी, पोस्ट लाटे, ता. बारामती, जि. पुणे) असे संशयिताचे नाव आहे.

याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत संबंधित महिला रस्त्यावरून निघाली असताना संशयित स्प्लेंडर (एमएच ४२ एयु ६८७२) मोटरसायकलवरून तोंडाला मास्क लावून आला. तिच्याजवळ आल्यावर गाडीचा वेग कमी करत तिच्या छातीला हात लावला. तसेच पुढे जावून मोटर सायकल थांबवून अश्लिल इशारे करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य त्याने केले.

आरोपीला शोधून काढले 

संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांना विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी शोधण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक नलावडे यांनी वेगवेगळी पथके तयार करुन तपास सुरू केला. गावातील गोपनीय बातमीदारांकडून संशयित इसमाबाबत माहिती घेतली असता संशयिताचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी तात्काळ हालचाली करून संशयिताला पकडून पोलीस ठाण्यात आणले तसेच त्याची मोटरसायकल ताब्यात घेतली. फिर्यादी महिलेने आरोपी आणि त्याची मोटरसायकल ओळखली आहे. पोलिसांनी संशयितावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे, सहाय्यक पोलीस फौजदार विलास यादव, अंकुश गार्डी, पोलीस हवालदार सचिन वीर, नितीन नलवडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित बोराटे, दीपक पालेपवाड यांनी केली आहे. फक्त तीन तासात हा गुन्हा उघड केल्याबद्दल जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी शिरवळ पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

पीडित महिलांनी संपर्क साधावा !

आरोपीने याप्रकारचे कृत्य आणखी काही महिलांसोबत केले असल्याचे नाकारता येत नाही. तरी याप्रकारचे कृत्य ज्या महिलांसोबत झाले असेल त्यांनी शिरवळ पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक नयना कामथे (मोबाईल नं. ८१८०९५१६१७) व सपना दांगट (मोबाईल नं. ९५४५६५०६००) यांच्याशी अथवा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे (मोबाईल ९५८८६०९९११ / ९२२३००६१४५) संपर्क साधावा. आपले नाव, पत्ता व इतर महिती गोपनीय ठेवली जाईल असे आवाहन शिरवळ पोलिसांनी केले आहे.  

नंबर प्लेटचा फोटो पाठवा

आपणास येताजाता एखादा मास्क अथवा हेल्मेट घातलेला संशयित एखाद्या महिलेसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे निदर्शनास आल्यास लगेच आपल्या मोबाईलद्वारे त्या संशयिताच्या मोटरसायकलचा नंबर प्लेटसह व्यवस्थित फोटो काढून उपरोक्त क्रमांकावर पाठवावा, जेणेकरून अशा कृत्यांना आळा बसेल असे आवाहनही पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या