Satara Story : महाराणी येसूबाईंचे स्मरण


साताऱ्यात आगमन झाले त्याला झाली तब्बल 306 वर्षे

आज ४ जुलै. स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोरल्या सुनबाई, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी, पहिले शाहू महाराज यांच्या मातोश्री, स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांचे मोघलांच्या २९ वर्षांच्या कैदेतून मुक्त होऊन राजधानी साताऱ्यात आगमन झाले तो शौर्यदिन. 

- गजानन चेणगे 

४ जुलै १७१९ या दिवशी महाराणी येसूबाई स्वराज्याच्या राजधानीत आल्या तो स्वराज्यासाठी अत्यंत रोमांचक आणि अपूर्व आनंदाचा दिवस होता. त्याप्रीत्यर्थ रयतेने त्यांची भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला होता. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयनिष्ठेचा त्यांच्यावर संस्कार होता. शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी महाराणी येसूबाई यांनी केलेल्या असीम त्यागाला जगाच्या इतिहासात तोड नाही. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत असताना आणि रायगडाला झुल्फिकार खानाचा वेढा घट्ट होत असताना स्वराज्याचे रक्षण हा दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी ९ फेब्रुवारी १६८९ रोजी छत्रपती राजाराम महाराजांचे मंचकारोहण केले आणि मोघलांच्या विळख्यातून बाहेर पडून जिंजीला जाण्यास सांगितले. यातून त्यांची मुत्सद्देगिरी आणि दूरदृष्टी दिसून येते. स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेल्या बलिदानाप्रमाणेच महाराणी येसूबाई यांनी केलेल्या त्यागाचेही महत्त्व खूप मोठे आहे. 

सुटकेसाठी शाहूराजांचे डावपेच

छत्रपती शाहू महाराज (पहिले) त्यांनी आपल्या मातोश्रींच्या सुटकेसाठी केलेले डावपेच यशस्वी होऊन ४ जुलै १७१९ या दिवशी महाराणी येसूबाई स्वराज्यात आल्या. त्यापुढे त्यांचे राजधानी साताऱ्यातच वास्तव्य होते. त्यांचे महानिर्वाण सातारच्या भूमीत झाले. संगम माहुली येथे कृष्णा - वेण्णा संगमाजवळ त्यांची समाधी आहे. त्यांनी स्वराज्यासाठी केलेल्या असीम त्यागाबद्दल त्यांच्या पवित्र स्मृतीस लाख लाख दंडवत !

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या