Mumbai News : सातारा रत्न पुरस्कारासाठी आवाहन


आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या दसरा मेळाव्यात होणार सन्मान

Mumbai News : मुंबईतील आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने सातारा जिल्ह्यातील नामवंतांना सातारा रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असून त्यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनी आपली नामांकने पाठवण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी केले आहे.

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा दसरा मेळावा दसर्‍याच्या पूर्वसंध्येला (दि. १ ऑक्टोबर) होत आहे. यानिमित्त राजकारण, समाजकारण, प्रशासन, शिक्षण, साहित्य, उद्योग, कला, क्रीडा, सहकार, पत्रकारिता, वैद्यकीय, विज्ञान अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सातारा जिल्ह्यातील नामवंतांना 'सातारा रत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. 

नामांकनासाठी 26 सप्टेंबरची मुदत

या पुरस्कारासाठी आपली नामांकने ही aamhisatarkar25@gmail.com या ई मेलवर किंवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डीग, डाॅक्टर कंपाऊंड, चिंचपोकळी पूर्व, मुंबई-४०००१२ या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा कुरिअरने २६ सप्टेंबरपर्यत पाठवावीत. अधिक माहितीसाठी ९९६७९१५५७७ / ९९७८१९९५६५ किंवा ०२२-२३७४९६३८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन माजी आमदार बाबुराव माने यांनी केले आहे. 

Aamhi Satarkar Vikas Pratishthan, Ex MLA Baburao Mane, Shivsena (Uddhav Balasaheb Thakrey), MP Sanjay Raut

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या