Satara News : भाटमरळीत सौर ऊर्जा प्रकल्प


शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते लोकार्पण; साडेचार हजार शेतकऱ्यांना लाभ

Satara News : सातारा तालुक्यातील भाटमरळी येथे उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे या भागातील ४५०० शेतकऱ्यांना १२ तास विद्युत पुरवठा होणार असून यामुळे शेतकऱ्यांचा विजेच्या कमतरतेचा मोठा प्रश्न मिटला आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. 

शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनासाठी मुबलक विद्युत पुरवठा व्हावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प' या योजनेअंतर्गत महावितरण कंपनीच्या माध्यमातून भाटमरळी येथे ६ मेगा वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. 

रात्री पाणी देण्याचा त्रास वाचणार

या प्रकल्पासाठी भाटमरळी ग्रामपंचायतीने २५ एकर जागा दिली असून या प्रकल्पामुळे भाटमरळीसह परिसरातील शिवाजीनगर, शेळकेवाडी, कुसवडे, पिलाणीवाडी, कुमठे, राकुसलेवाडी, शेरेवाडी, आसनगाव, निनाम पाडळी, मांडवे, सोनापूर, वेचले आदी गावातील ४५०० शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे सर्व शेतकऱ्यांना दिवसा १२ तास थ्री फेज कनेक्शन म्हणजेच वाढीव ४ तास योग्य दाबाने वीज पुरवठा होणार आहे. त्यामुळे रात्री शेतीला पाणी देण्याचा त्रास वाचणार आहे. या प्रकल्पामुळे भाटमरळी ग्रामपंचायतीला पुढील तीन वर्ष ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक असून या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी महावितरणचे अधिक्षक अभियंता बाळासाहेब हरनोळ, कार्यकारी अभियंता अमित बारटक्के, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अरविंद चव्हाण, सातारा तालुका खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन राजेंद्र यादव, संचालक सुरेंद्र देशपांडे, विजय पोतेकर, विनय गावडे, सयाजी चव्हाण आदी मान्यवरांसह परिसरातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.

CM Devendra Fadnavis, Shivendrasinhraje Bhosale, Chief Minister solar energy project, Mahavitran

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या