Mumbai News : लोकशाहीर अण्णाभाऊंच्या कन्येचे निधन


शकुंतलाबाई सपताल यांच्या पार्थिवावर नालासोपारा येथे अंत्यसंस्कार

Mumbai News : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय कन्या शकुंतला अजित सपताल (वय ९२) यांचे रविवारी (दि. २) पहाटे २.४५ वाजता नालासोपारा येथील रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. नालासोपारा येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात संजय, राजेश, प्रशांत ही मुले, मुलगी नंदिनी व नातवंडे असा परिवार आहे.

शकुंतला यांना ब्रेनस्टोक आल्यानंतर गेले काही दिवस त्याच रुग्णालयातच उपचार घेत होत्या. त्या अलिकडे नालासोपारा येथे प्रशांत या मुलाच्या घरी रहात होत्या. त्यांचा विवाह ईश्वरपूर येथील शिक्षित तरुण अजित सपताल यांच्यासोबत अण्णा भाऊ साठे यांनीच करून दिला होता.

अण्णाभाऊंचा चळवळीचा वारसा

शकुंतलाबाई या बालपणी कम्युनिस्ट पक्षाच्या बाल संघात व ज्येष्ठ बहिण कॉ. शांताबाई, रोझा डांगे, कमल व सत्येंद्र मोरे, प्रभाकर मिरजकर, सुमन मोकाशी (संझगिरी) आदी बाल कार्यकर्त्यांसह सांस्कृतिक कलापथकात सक्रिय होत्या. तसेच पक्षाच्या मुखपत्रांची विक्री करण्यात आई कॉ. जयवंताबाई साठे यांच्या समवेत आघाडीवर असत. अण्णा भाऊ साठे चिरागनगरात भूमिगत असताना त्यांना पोलिसी ससेमिरा चुकवून कम्युनिस्ट पक्षाचे साहित्य, पत्रक त्या गुपचूप भेटून देत असत.

अण्णाभाऊंच्या पहिल्या वाचक

अण्णा भाऊ साठेंच्या अनेक कथा, कादंबऱ्यांच्या त्या प्रथम वाचक असत. अण्णा भाऊंचे अक्षर गिचमिड असल्याने त्यात त्या सुधारणा करीत असत. त्यांना स्वतःलाही लिखाणाची व साहित्याची आवड असल्याने, त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी अविस्मरणीय आठवणींचे लेखनही काही दिवाळी अंकात केले होते. त्यातील अण्णा भाऊ साठेंच्या गाजलेल्या "फकिरा" कादंबरी लेखना संदर्भातील आठवण तर खूपच ह्रदयद्रावक शब्दात त्यांनी लिहिली होती. त्यांना अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याची व त्यांच्या राजकीय कार्याची चांगली जाण, समज होती. कॉ. अण्णा भाऊ साठे यांनी त्यांचे एक पुस्तकही शकुंतलाबाई व शांताबाई या मुलींना अर्पण केले आहे.

त्या लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंच्या सामाजिक, सांस्कृतिक व व्यक्तिगत कौटुंबिक जीवनाच्या अखेरच्या एकमेव साक्षीदार होत्या.

Lokshahir Annabhau Sathe, Shakuntala Saptal

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या