शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रयत्नांनी निधी मंजूर; उद्यानाचा होणार कायापालट
Satara News : सातारा शहरातील ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या 'नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान' या योजनेतून तब्ब्ल ५ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारच्या गांधी मैदान येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यान विकसित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारने ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. निधी उपलब्ध झाल्याने ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाचे रुपडे पालटणार असून याठिकाणी नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करून या परिसराचा कायापालट केला जाणार आहे.
आराखडा तयार करण्याच्या सूचना
दरम्यान, उपलब्ध निधीनुसार या उद्यानाचा विकसित डीपीआर तातडीने तयार करण्याच्या सूचना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांना दिल्या आहेत. यासंदर्भात तातडीने अनुभवी व तज्ज्ञ आर्किटेक्ट नियुक्त करून विकास आराखडा तयार करावा. उद्यान परिसराचा विकास करताना नागरिकांसाठी कोणत्या आवश्यक सोयीसुविधा निर्माण करता येतील, वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळणी यासह आकर्षक बागबगीचा विकसित करणे आणि संपूर्ण परिसराचा कायापालट करणे यादृष्टीने आराखडा तयार करून तातडीने पुढील कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी नगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत.
PWD Minister Maharashtra, Shrimant Chhatrapati Shivendrasinhraje Bhosale
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या