सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे शुक्रवारी आयोजन; लाभ घेण्याचे आवाहन
Satara News : सातारा येथील एम. डी. शिंदे चॅरिटेबल अँड मेडिकल ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी (दि. १४) सातारा डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी करण्यासाठी मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येकाने आपल्या हाडांचे आरोग्य जपणे गरजेचे असून त्यासाठी ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा वेळेवर ओळखला पाहिजे. त्यासाठीच हे शिबिर आयोजित केले आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिलांनी विशेषतः रजोनिवृत्तीनंतर, कॅल्शियमची कमतरता असलेले रुग्ण, वारंवार पाठदुखी - सांधेदुखी किंवा हाडे दुखण्याचा त्रास असलेले रुग्ण, सर्वसामान्य, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण, ओपीडीसाठी येणारे रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. नावनोंदणीसाठी ०२१६२-२२७२२९ किंवा ९९२१९९८००० क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ट्रस्टने केले आहे.
Satara health news, Bone Mineral Density
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या