सातारा एलसीबीची मोठी कारवाई; २५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Satara News : महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा मालट्रकमध्ये चुरमुऱ्यांच्या पोत्यांच्या आड लपवून पुण्याकडे नेला जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे येथे सापळा लावून पकडला. या कारवाईत एकूण १७ लाख ६५ हजार ९४० रुपये किंमतीचा ८९५.८ किलो माल व साडेसात लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आले आहे.
मच्छिंद्र आकाराम कांबळे (वय ५४, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) असे अटक केलेल्या इसमाचे नाव आहे. दोन इसम ट्रकमधून (एमएच १० झेड ४६९६) महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री व वाहतुकीस बंदी असलेला गुटखा/पानमसाला घेऊन सांगलीहून पुणे बाजुकडे घेऊन जात असल्याबद्दल खात्रीशीर टीप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना सोमवारी (दि. ३) मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या अधिपत्याखालील पथकास संबंधित वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
नागठाणे येथे लावला ट्रॅप
या पथकाने नागठाणे (ता. सातारा) येथे राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ सापळा लावून रात्री अडीच वाजता हा मालट्रक पकडला. त्यामधील दोन इसमांकडे विचारपूस केली असता, त्यांनी वाहनामध्ये विमल पानमसाला असल्याचे सांगितले. या कारवाईत चिरमुऱ्याच्या पोत्यांच्या आडबाजूस लपवून ठेवलेला विमल पान मसाला व तंबाखू असा एकूण १७ लाख ६५ हजार ९४० रुपये किंमतीचा माल व साडेसात लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण २५ लाख १५ हजार ९४० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांना कळवल्यानंतर त्यांनी हा ताब्यात घेतलेला अवैध गुटखा/पान मसाला जप्त केला. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईत यांचा सहभाग
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, मच्छिंद्रनाथ पाटील, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, सुजित भोसले, अमित सपकाळ, स्वप्नील शिंदे, ओंकार यादव, अमित माने, मोहन पवार तसेच बोरगाव पोलीस ठाण्याचे दिपकुमार मांढवे, निलेश गायकवाड, सुनिल कर्णे, जगदीश कणसे, विशाल जाधव, धीरज महाडीक यांनी केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या