Satara News : सुरूरला पकडले बेकायदा पिस्टल


भुईंज पोलिसांची कारवाई; आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी  

Satara News : पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते पुणे दरम्यान सुरूर येथील उड्डाणपुलाखाली लोड केलेले देशी बनावटीचे पिस्टल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या आरोपीला भुईंज पोलिसांनी जेरबंद केले. वाई न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

प्रसाद शुक्राचार्य बागल (रा. सुरूर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. २८) रात्री सव्वा दोनच्या सुमारास भुईंज पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे हे पोलीस हवालदार नितीन जाधव, आप्पा कोलवडकर, पोलीस शिपाई सोमा बल्लाळ, सागर मोहिते यांच्यासह सरकारी वाहनातून कवठे परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, ग्रे कलरचा फुल बाह्याचा टीशर्ट व काळ्या रंगाचा हाफ बरमुडा घातलेला एक इसम सुरुर (ता. वाई) गावच्या हद्दीत उड्डाण पुलाखाली उभा असून त्याच्या कमरेला पिस्टल लावलेली आहे अशी माहिती पृथ्वीराज ताटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली.

उद्देश काय ? तपासात स्पष्ट होणार 

मिळालेल्या माहितीनुसार लगेच त्या ठिकाणी पोहोचून खात्री केली असता उपरोक्त वर्णनाप्रमाणे असलेला इसम संशयितरित्या पुलाखाली उभा असलेला दिसला. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. ४५ हजार रुपये किमतीचे हे देशी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपी मध्यरात्री जवळ पिस्टल घेऊन का फिरत होता ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. 

आरोपीला वाई न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश मोरे करत आहेत.

Bhuinj Police station, Satara district police

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या