सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशनचे उमदे नेतृत्व हरपले; साताऱ्यात अंत्यसंस्कार
Satara News : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सातारा येथील सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता विजय कृष्णराव उर्फ बाळासाहेब देशमुख (वय ६८) यांचे प्रदीर्घ आजारानंतर सातारच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली (सातारा) येथील कैलास स्मशानभूमीमध्ये कोणतेही धार्मिक विधी न होता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी उज्ज्वला, मुलगा वैभव व सून असा परिवार आहे.
कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता या पदावर त्यांनी काम केले आहे. डोंबिवली, बारामती, सातारा, वारणानगर या ठिकाणी त्यांनी वीज वितरण कंपनीमध्ये काम केले आहे. सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन या संघटनेचे ते सक्रिय नेते व संघटक होते. दिलखुलास व उमदे व्यक्तिमत्व असलेल्या बाळासाहेब देशमुख यांनी अनेक सामाजिक संघटनांना व संस्थांना नेहमी सहकार्य केले. ते सातारच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी विद्यार्थी होते.
Mahavitaran, Subordinate Engineers association
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या