साताऱ्यातील तीनशेहून अधिक तरूणांना मिळणार रोजगार संधी
Satara News : सुमारे १०३ वर्षाची प्रदीर्घ आणि दैदिप्यमान ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या तसेच सातारच्या औद्योगिक नकाशावर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कूपर उद्योग समूहाने आपल्या नवीन विस्तार प्रकल्पाची घोषणा केली आहे. या भव्य प्रकल्पामुळे साताऱ्यातील तीनशेहून अधिक तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सातारच्या औद्योगिक प्रगतीचा कणा मानल्या जाणाऱ्या कूपर कॉर्पोरिशनने हाती घेतलेल्या या नवीन प्रकल्पाचा इंजिनसाठी लागणाऱ्या विविध सुट्ट्या भागांची निर्मिती क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवणे हा मुख्य उद्देश आहे. कूपर कॉर्पोरिशनच्या एकूण उत्पादनापैकी ६० टक्क्यांहून अधिक भाग अमेरिका, युरोप आणि जगातील इतर प्रगत देशांमध्ये निर्यात केला जातो. कंपनीने गतवर्षी बाजारात दाखल केलेल्या 'कूपर ट्रॅक्टर'च्या चारही व्हेरिएंट्सना ग्राहकांचा आणि शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या नव्या विस्तार प्रकल्पामुळे साताऱ्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला आणखी मोठी गती मिळेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
हाय-टेन्शन वीजवाहिन्यांचा अडसर
दरम्यान, नवीन एम. आय.डी.सी. मधील कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. च्या इंजिन विभागातील युनिट एम-६०/१ या जागेवर विस्तारीकरण निश्चित करण्यात आले आहे. मात्र, या प्लॉटच्या मध्यातून ३३ के. व्ही. आणि २२ के. व्ही. क्षमतेच्या हाय-टेन्शन वीजवाहिन्या गेल्या आहेत. सुरक्षा नियमांनुसार या तारांखाली कोणतेही बांधकाम करता येत नाही. त्यामुळे बांधकामासाठी संपूर्ण जागा खुली उपलब्ध व्हावी यासाठी या वीज वाहिन्या या प्लॉटच्या सीमारेषेकडे स्थलांतरित करणे अत्यावश्यक बनले आहे.
स्थलांतरित करण्यासाठी प्रस्ताव
यासाठी कूपर कॉपेरिशन प्रा. लि. ने 'महावितरण' आणि 'महापारेषण'कडे रीतसर प्रस्ताव पाठवले आहेत. मात्र, या प्रस्तावांवर वेळेत निर्णय न झाल्याने प्रत्यक्ष स्थलांतरास आणि पर्यायाने विस्तारीकरणाच्या कामास विलंब होत आहे. याशिवाय इतर संबंधित शासकीय परवानग्याही तातडीने मिळणे गरजेचे आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देणाऱ्या या प्रकल्पासाठी वीज कंपन्यांनी तांत्रिक मंजुरी जलद गतीने देऊन वीज वाहिन्या प्लॉटच्या सीमारेषेवर स्थलांतरित करण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी सातारकरांकडून होत आहे.
Cooper Corporation, Satara MIDC, Mahavitaran
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या