एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट; वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या दृष्टीने महत्त्वाची गरज
आपण कितीही काळजीपूर्वक प्लॅन केला तरीही आयुष्यात अनपेक्षित घटनांना सामोरे जावे लागते. अचानक उद्भवलेले आजार, अनपेक्षित अपघात किंवा अगदी नियमित तपासणीतून होणाऱ्या निदानातून मोठ्या आर्थिक खर्चाचा भार पेलावा लागू शकतो. वर्षागणिक वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चामुळे आता हेल्थ इन्श्युरन्स हे केवळ एक सुरक्षा कवच नसून महत्त्वाची गरज बनली आहे.
- अमरनाथ सक्सेना,
चीफ टेक्निकल ऑफिसर –कमर्शियल, बजाज जनरल इन्श्युरन्स लिमिटेड (पूर्वीची बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड)
आयुष्य हे नेहमी नवनवीन घडामोडींनी भरलेले असते. घरात छोट्या पाहुण्यांचे आगमन असो की वृद्ध पालकांची काळजी किंवा आयुष्यात नव-नवीन टप्पे गाठणे अशा आयुष्यात घडणाऱ्या स्थित्यंतरांबरोबर तुमचे इन्श्युरन्स कव्हरेजही अपडेट असणे तितकेच महत्वाचे ठरते. म्हणूनच, दरवर्षी तुमची पॉलिसी रिव्ह्यू करणे खूप गरजेचे आहे; जेणेकरून वाढत्या वयासोबत आणि बदलत्या परिस्थितीनुसार तुम्हाला संपूर्ण संरक्षण मिळत राहील.
हेल्थ इन्श्युरन्सचा वार्षिक रिव्ह्यू का महत्वाचा?
जशी जीवनशैली, तसा प्लॅन : ज्याप्रमाणे तुमच्या जीवनशैलीत बदल होतो, त्याचप्रमाणे तुमच्या हेल्थ इन्श्युरन्सची आवश्यकता बदलत असते. तणावाची पातळी, खाण्यापिण्याच्या सवयी, कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण, प्रवासाची फ्रिक्वेन्सी आणि वय या सर्व गोष्टींचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. जसे की, नियमित प्रवास करणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय वैद्यकीय खर्चास कव्हरेज गरजेचे असू शकते, तर जास्त मानसिक तणावाचे काम करणाऱ्या व्यक्तीला मधुमेह किंवा रक्तदाबासारख्या आजारांसाठी मोठ्या कव्हरेजची गरज भासू शकते. दरवर्षी तुमच्या प्लॅनची तपासणी केल्यामुळे तुमचे कव्हरेज परिस्थितीनुसार बदलत राहते आणि भविष्यातील वाढत्या वैद्यकीय खर्चासाठी तुम्हाला एक परिपूर्ण आर्थिक संरक्षण मिळते.
नवीन प्रॉडक्ट्स आणि वैशिष्ट्यांबद्दल माहिती भारतातील हेल्थ इन्श्युरन्स मार्केट वेगाने बदलत आहे. जिथे कंपन्या नेहमीच नवीन प्लॅन्स आणत असतात किंवा जुन्या प्लॅन्समध्ये सुधारणा करत असतात. या सुधारणांमुळे तुम्हाला जास्त कव्हरेज, कमीत कमी वेटिंग पिरियड किंवा वेलनेस प्रोग्राम आणि मोफत आरोग्य तपासणी यासारख्या अतिरिक्त सुविधा मिळू शकतात. जर तुम्ही तुमच्या प्लॅनचा वेळोवेळी रिव्ह्यू केला नाही, तर या नवीन सुविधा आणि त्याचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत. अपडेट राहिल्यामुळे, तुम्ही तुमच्या सध्याच्या प्लॅनची नवीन पर्यायांसोबत तुलना करू शकता आणि प्लॅन बदलल्याने तुम्हाला अधिकाधिक लाभ आणि चांगले संरक्षण मिळण्याची खातरजमा करु शकता.
संचयी बोनसचा लाभ : तुम्ही क्लेम न केलेल्या प्रत्येक वर्षासाठी बहुतेक कंपन्या तुम्हाला संचयी बोनस देतात. हा बोनस दरवर्षी दहा ते शंभर टक्केपर्यंत असू शकतो आणि हा फायदा एकतर तुमची कव्हरेज रक्कम वाढवून किंवा तुमचा प्रीमियम कमी करून दिला जातो. समजा, तुमच्या पॉलिसीची एकूण इन्श्युरन्स रक्कम पाच लाख आहे. आता २० टक्के संचयी बोनस मिळाल्यामुळे, कोणताही एक्स्ट्रा खर्च न करता ही रक्कम थेट सहा लाखांपर्यंत वाढू शकते. मात्र, जर तुम्ही तुमच्या पॉलिसीचा नियमित रिव्ह्यू केला नाही, तर तुम्हाला या फायद्यांचा पूर्ण लाभ घेता येणार नाही आणि गरज नसताना जास्त पैसे भरावे लागू शकतात. वार्षिक रिव्ह्यू केल्यामुळे तुम्हाला तुमचे एनसीबी योग्यप्रकारे ट्रॅक करण्यासाठी आणि वापरण्यासाठी मदत होते.
पूर्व-विद्यमान आजारांसाठी कव्हरेज : जर तुम्हाला पूर्वीपासूनच मोतिबिंदू, मधुमेह किंवा हृदयविकार यांसारखे आजार असतील, तर हेल्थ इन्श्युरन्समध्ये त्यांच्या कव्हरेजसाठी तुम्हाला काही काळ वाट पहावी लागू शकते. हा वेटिंग पिरियड वेगवेगळ्या इन्श्युरन्स कंपन्यांनुसार वेगळा असू शकतो. दरवर्षी आपला प्लॅन तपासून पाहिल्यास, याच आजारांसाठी कमी वेटिंग पिरियड किंवा चांगल्या अटी देणारी दुसरी कंपनी शोधणे सोपे होते. उदाहरणार्थ, तुमच्या चालू प्लॅनमध्ये मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी दोन वर्षांची वाट पाहावी लागत असेल आणि दुसरा प्लॅन तेवढ्याच प्रीमियममध्ये एका वर्षात कव्हरेज देत असेल, तर नवीन प्लॅन घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. नियमितपणे प्लॅनची तपासणी केल्यामुळे, चालू कंपनीसोबतच राहायचे की दुसरा आणखी चांगला पर्याय निवडायचा हे ठरवणे सोपे जाते.
वाढत्या वैद्यकीय खर्चाशी सुसंगतता : भारतामध्ये वैद्यकीय खर्च झपाट्याने वाढत आहेत, विशेषतः कॅन्सर, हृदयविकार किंवा अवयव प्रत्यारोपणासारख्या गंभीर आजारांवरील उपचाराचा खर्च हा काही लाख रुपयांमध्ये असतो. एकीकडे वैद्यकीय खर्च वाढत असतानाही जर तुमच्या कव्हरेजची रक्कम तेवढीच राहिली तर तुम्हाला असा मोठा खर्च स्वतः करावा लागेल. ज्यामुळे तुमचे आर्थिक बजेट कोलमडू शकते. तुमच्या प्लॅनची वार्षिक तपासणी केल्यामुळे तुम्हाला तुमची इन्श्युरन्स रक्कम वाढवण्याची किंवा गंभीर आजारांसाठीचे कव्हर यासारखे अतिरिक्त फायदे समाविष्ट करण्याची संधी मिळते. जेणेकरुन भविष्यातील वैद्यकीय खर्चासाठी तुमची पॉलिसी परिपूर्ण ठरेल आणि अपडेटेड राहील.
ॲन्युअल हेल्थ इन्श्युरन्स रिव्ह्यू ही केवळ एक औपचारिकता नसून बदलत्या जीवनशैलीनुसार तुमचे कव्हरेज अपडेट ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. तुम्ही खरेदी केली आणि विसरला अशी हेल्थ इन्श्युरन्स ही बाब नव्हे; हे तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक हिताचे रक्षण करणारे एक महत्त्वाचे संरक्षण कवच आहे. दरवर्षी प्लॅन रिव्ह्यू केल्यामुळे आयुष्यातील मोठे बदल, वाढते वैद्यकीय खर्च आणि नवीन हेल्थकेअर सुविधा यानुसार तुमची पॉलिसी नेहमी अपडेट राहते. एका सोप्या सवयीमुळे तुमच्या कुटुंबाचे संरक्षण, कव्हरेजची वॅल्यू वाढते आणि आकस्मिक संकटासाठी तयार राहता येते. थोडक्यात सांगायचे तर, ॲन्युअल रिव्ह्यू करणे ही केवळ एक चांगली सवय नसून तुमच्या गरजेनुसार इन्श्युरन्स नेहमी अपडेट आणि खात्रीशीर ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
Health Insurance, Bajaj general insurance limited
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या