'सेवा संकल्प अभियानांतर्गत' आयोजन; १६५ ग्रामस्थांनी घेतला लाभ
Kaas Plateau News : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ सातारा वन विभाग व कृष्णा हॉस्पिटल (कराड) यांच्या संयुक्त विद्यमाने कास पठार येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा अटाळी, कासानी, पाटेघर, कास, एकीव व कुसुंबी परिसरातील १६५ ग्रामस्थांनी लाभ घेतला.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौन्धल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वनक्षेत्रपाल संदिप जोपळे (सातारा) व वनक्षेत्रपाल संतोष पाटील (मेढा) यांच्या प्रयत्नातून हे शिबिर आयोजित करण्यात आले. सातारा व मेढा वनपरिक्षेत्रातील दुर्गम भागातील ग्रामस्थ तसेच कास पुष्प हंगामात कार्यरत स्वयंसेवक, रोजंदारी वनमजूर, गाईड, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य व वन विभागातील कर्मचारी यांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा उद्देश होता.
ईसीजी तपासणीची मोफत सुविधा
कृष्णा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने उच्च रक्तदाब, स्त्रीरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, त्वचारोग, रक्तातील साखर, दंतविकार तसेच कान-नाक-घसा यांसह विविध आजारांची तपासणी केली. गरजेनुसार ग्रामस्थांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच शिबिरात मोफत ईसीजी तपासणीची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष सीताराम बदापुरे, उपाध्यक्ष प्रदीप कदम, कार्यकारी समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी वनपाल दीपाली सागावकर, उज्ज्वला थोरात, वनरक्षक प्रकाश शिंदे, समाधान वाघमोडे, जयंत निकम व तुषार लगड यांनी विशेष परिश्रम घेतले.
Forest department, Kaas Plateau of Flowers
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या