विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व हरपले; सौंदलगा येथे अंत्यसंस्कार
Nipani News : सौंदलगा (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथील प्रतिष्ठित नागरिक व निवृत्त शिक्षक कांतीनाथ पारिसा कासार (वय ८०) यांचे नुकतेच अल्प आजाराने सौंदलगा येथे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून, जावई, भाऊ-भावजय, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कांतीनाथ कासार हे गेले काही दिवस आजारी होते. त्यांच्यावर निपाणी व कोल्हापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर सौंदलगा येथे शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.
रविवारी रक्षा विसर्जन विधी
कासार सर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या मातोंड (जि. सिंधुदुर्ग), शाहूवाडी, सरूड तसेच हुपरी (जि. कोल्हापूर) येथे मिळून ३८ वर्षे गणित व विज्ञानाचे शिक्षक म्हणून कार्य केले. हुपरी येथील लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलमध्ये त्यांची सर्वाधिक २२ वर्षे सेवा झाली. विद्यार्थीप्रिय व शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते सुपरिचित होते. त्यांचा रक्षा विसर्जन विधी रविवारी (दि. २७) सकाळी नऊ वाजता सौंदलगा येथे होणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या