Satara Crime News : परजिल्ह्यात खून; या जिल्ह्यात बॉडी


चुकीचे वागणाऱ्या मुलीला बाप-काकाने संपवले; १५ दिवसात मर्डर मिस्ट्री उघड

Satara Crime News : पुणे जिल्ह्यात खून करून सातारा जिल्ह्यात मृतदेह आणून टाकल्याचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या आव्हानात्मक मर्डर मिस्ट्रीचा सातारा पोलिसांनी पंधरा दिवसात छडा लावला आहे. मृतदेह सापडलेल्या मुलीचा खून तिच्या चुकीच्या वर्तनाला वैतागून तिचा बाप व चुलत्याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. 

खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे शिरवळ - राजेवाडी रस्त्यालगत निर्मनुष्य ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर १४ सप्टेंबर रोजी एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. शिरवळ पोलीस ठाण्यात त्याबाबत नोंद झाली होती. प्रथमदर्शनी हा मृत्यू संशयास्पद वाटत असल्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना दिल्या होत्या. त्यानुसार घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून तपास सुरू केला होता.

पहिले आव्हान ओळख पटवण्याचे

दरम्यान, मृत्यू झालेल्या महिलेची ओळख पटविण्याचे पहिले आव्हान पोलिसांपुढे होते. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, पोलीस अंमलदार अमोल माने, जयवंत खांडके, स्वप्निल कुंभार, स्वप्निल दौंड, विजय निकम यांनी शिरवळ भागात १६ दिवस ठाण मांडून अहोरात्र मेहनत घेतली. कोणत्याही प्रकारचा धागादोरा नसताना वेळावेळी घटनास्थळाची पाहणी करुन, तसेच घटनास्थळापासून पुणे तसेच भोर बाजुकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करुन, भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर, सातारा - पुणे हायवे इत्यादी भागात वारंवार पेट्रोलींग करुन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली. तांत्रिक तपासाद्वारे खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता वापरलेल्या वाहनाचा माग काढुन वाहनाचा शोध घेतला व त्याआधारे खून करणाऱ्या इसमांना शोधून काढले. यातून अखेर मृतदेहाची ओळख पटली. 

खून करून बॉडीची विल्हेवाट

कु. हर्षदा हणुमंत जाधव (वय १९, रा. लक्ष्मीविषणु पार्क, प्लॅट नं. 506, जांभुळवाडी, आंबेगांव खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून तिचा खून तिचे वडील हणुमंत दामोदर जाधव व चुलत-चुलता बाळू अंकुश जाधव (रा. प्रगतीनगर, इंदोरी, तळेगांव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. ही मुलगी घरातील लोकांना शिवीगाळ करणे, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरणे, व्यसन करणे, घरातील लोकांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देणे अशाप्रकारे त्रास देत असल्याच्या कारणावरून वडील व चुलते यांनी या मुलीला बाहेर हॉटेलला जेवण करण्यास जायचे असल्याचे सांगून गाडीतून नेले. त्यानंतर डोळ्यात व तोंडात चटणी घालून हाताने तोंड व नाक दाबून तिचा खून केला. आरोपींना ताब्यात घेऊन शिरवळ पोलिसांकडे सोपवण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

यांनी केली गुन्ह्याची उकल

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी, पोलीस अंमलदार अतिष घाडगे, राजु मुलाणी, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष सपकाळ, साबीर मुल्ला, हणमंत भोसले, अमोल माने, जयवंत खांडके, शिरवळ पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक किर्ती म्हस्के, नितीन खामगळ, प्रशांत धुमाळ, सूरज चव्हाण, अक्षय बगाड यांनी केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या