छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रस्तावित जागेची पाहणी
Satara Sports News : सातारा शहरासह जिल्ह्यात क्रिकेट खेळाडू मोठ्या संख्येने तयार होत आहेत. या खेळाडूंसाठी तसेच राज्य, राष्ट्रीय स्तरासह रणजी सामने साताऱ्यात खेळले जावेत आणि हे सामने पाहण्याचा आनंद सातारकरांना घेता यावा, यादृष्टीने सातारा शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
सातारा शहरातील ठक्कर सिटीलगत आयुर्वेदिक गार्डनशेजारी सातारा नगरपरिषदेच्या मालकीची सुमारे ११ एकर जागा असून या जागेमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त सुसज्ज आणि प्रशस्त असे क्रिकेट स्टेडियम उभारण्याची मागणी जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी शिवेंद्रसिंहराजे यांना होती.
त्यांच्या मागणीला शिवेंद्रसिंहराजे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून रविवारी त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, जयंत महाजनी, इर्शाद बागवान, निशांत गवळी, धैर्यशील भोसले, पिंटू साळुंखे, भालचंद्र निकम यांच्यासह पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अहवाल सादर करण्याच्या सूचना
सातारा शहरात दर्जेदार क्रिकेट स्टेडियम असावे, यादृष्टीने आपले प्रयत्न सुरु असून त्याचसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने जागेची मोजणी व इतर बाबींचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
Cricket stadium in Satara, Shivendrasinhraje Bhosale, PWD Minister
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या