जावली तालुक्यातील दांपत्याची न्यायासाठी पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव
Satara News : वारंवार खोट्या तक्रारी करून मानसिक त्रास देणाऱ्या व कुटुंबाची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जावली तालुक्यातील बामणेवाडी (वालुथ) येथील कुंदा बबन गोळे व बबन सखाराम गोळे या दांपत्याने अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमच्याविरुद्ध काही व्यक्तींकडून वारंवार खोट्या व बिनबुडाच्या तक्रारी करण्यात येत आहेत. या खोट्या तक्रारींमुळे आम्हाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत असून, आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत आहे अशी तक्रार या निवेदनात गोळे दांपत्याने केली आहे. आमच्यावर होत असलेल्या या अन्यायाची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या