निसर्ग रक्षणाचा ध्यास : पर्यावरणपूरक मूर्तींना सातारकरांची विशेष पसंती
Satara News : सातारा येथील उदयोन्मुख शिल्पकार व चित्रकार जिगीषा राजीव मुळ्ये हिने यावर्षीही बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना पर्यावरणप्रेमी सातारकरांकडून पसंती मिळत आहे. अर्थात त्यांच्या मागणीनुसारच तिने मर्यादित स्वरूपात अशा गणेशमूर्ती साकारल्या आहेत.
साताऱ्यातील प्रसिद्ध रंगकर्मी व निसर्ग - पर्यावरण रक्षणासाठी झटणारे सक्रिय कार्यकर्ते राजीव मुळ्ये यांचाच वारसा जिगीषा चालवत आहे. तिने पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून पदवी संपादन केली असून कला क्षेत्रात योगदान देत आहे. गतवर्षी तिने प्रायोगिक तत्त्वावर शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवल्या होत्या. त्या अत्यंत कलात्मक होत्या. त्यामुळे त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले होते. परिणामी यंदाच्या गणेशोत्सवासाठी काही पर्यावरणप्रेमी सातारकरांनी अशा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी तिच्याकडे मागणी नोंदवली होती. त्यानुसार तिने काही मूर्ती साकारल्या आहेत.
गणेशमूर्तीना 'फिनिशिंग टच'
गणरायाच्या आगमनाचा दिवस समीप आल्यामुळे या गणेशमूर्तीना 'फिनिशिंग टच' देण्यात सध्या ती मग्न आहे. दोन-तीन दिवसात या मूर्तींचे रंगकाम पूर्णत्वास येईल असे तिने सांगितले. जीवसृष्टीच्या उत्तम भविष्यासाठी पर्यावरणाचे रक्षण आवश्यक असून ती आपली सर्वांचीच जबाबदारी आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या