Satara News : राज्य एकांकिका स्पर्धेची धामधूम


सातारा जिल्ह्यातील हौशी कलावंत, महाविद्यालयांना सहभागी होण्याचे आवाहन

Satara News : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुंबई येथील मुख्य शाखेच्या वतीने 'नाट्य परिषद करंडक २०२६' हा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. साताऱ्यातील हौशी कलावंतांनी, महाविद्यालयांनी या स्पर्धेला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

शंभराव्या नाट्य संमेलनाचे औचित्य साधून 'उत्सव रंगभूमीचा जागर हौशी नाट्य कलावंतांचा' असे ब्रीदवाक्य घेऊन सुरू केलेला हा महोत्सव सलग तिसऱ्या वर्षीही दिमाखात आयोजित करण्यात येत आहे. ही स्पर्धा महाविद्यालये तसेच नाट्य संस्था इत्यादींसाठी खुली आहे. या स्पर्धेचे स्वरूप प्राथमिक, विभागीय आणि अंतिम असे राहील. या स्पर्धेच्या अंतिम विजेत्या संघाला एक लाख रुपये व अन्य विजेत्यांनाही भरघोस बक्षिसे मिळणार आहेत.

दि. १८ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत

इतर जिल्ह्यांप्रमाणे साताऱ्यातही या स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रवेशिका भरण्याची अंतिम मुदत दि. १८ सप्टेंबर आहे. यासाठीचे प्रवेश नाट्य परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन भरायचे आहेत.  अंतिम फेरी मुंबई येथे २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.  सातारा केंद्रप्रमुख म्हणून राजेश कुंभारदरे तसेच सातारा स्थानिक समन्वयक म्हणून बाळकृष्ण शिंदे आणि आनंद उर्फ बाळू कदम काम पाहत आहेत. अधिक माहितीसाठी तसेच प्रवेश अर्ज भरण्यासाठी www.natyaparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन राजेश कुंभारदरे व बाळकृष्ण शिंदे यांनी केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या