Satara News : अजिंक्यताराची शेतकऱ्यांसाठी सुविधा


किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणीची यंत्रणा उपलब्ध

Satara News : ऊस पिकावर लोकरी मावा, तांबेरा व अन्य किडींचा प्रादुर्भाव होत असतो. हा प्रादुर्भाव रोखून ऊस उत्पादनात वाढ होण्यासाठी शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी द्रोणद्वारे फवारणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

कमी पावसामुळे आणि वातावरणातील बदलामुळे ऊस पिकावर विविध प्रकारच्या कीडीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उसाची वाढ खुंटणे, उत्पादन आणि वजनात घट होणे असे प्रकार होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजिंक्यतारा कारखान्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्षेत्रातील ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि साखर उतारा टिकवून ठेवण्यासाठी ऊस विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना ड्रोन फवारणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या