१० सप्टेंबरला सातारा मध्यवर्ती कारागृह या ठिकाणी साजरा होणार शौर्य दिन
Satara News : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सातारच्या जेलच्या तटावरून टाकलेल्या ऐतिहासिक उडीला ८२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १० सप्टेंबर हा दिवस सातारा मध्यवर्ती कारागृह येथे शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. वाळवा येथील हुतात्मा स्मारक व समितीच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे.
स्मारक समितीचे प्रमुख मार्गदर्शक वैभव नायकवडी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. १० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मध्यवर्ती कारागृहाच्या समोर असणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून शौर्य दिन साजरा केला जाणार आहे असे त्यांनी सांगितले.
सातारा जेल फोडला... तो हा दिवस
महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेने १९४२ चा स्वातंत्र्य लढा नागनाथअण्णा नायकवडी यांनी तीव्र केला होता. तत्कालीन सातारा जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामध्ये अनेक क्रांतिकारी चळवळी अण्णांच्या नेतृत्वाखाली सुरू होत्या. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी जहाल क्रांतिकारक म्हणून इंग्रज सरकारने त्यांच्यावर करडी नजर ठेवली होती. वाळवा येथे अण्णांना अटक झाली. त्यांना इश्वरपूर येथील कारागृहामध्ये ठेवले होते. क्रांतिकारक कोणत्याही परिस्थितीत अण्णांना सोडवणार. क्रांती चळवळ हाताबाहेर जाणार म्हणून क्रांतिकारक चळवळींचा वाढता प्रभाव पाहता. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना सातारा जेल येथे ठेवण्यात आले होते. परंतु त्यांनी इंग्रज सरकारच्या जोखडातून भारत मातेला मुक्त करण्यासाठी साहसाने सातारचा जेल फोडला आणि तिथून भिंतीवर उडी टाकून ते पसार झाले या इतिहासाला त्यांनी उजाळा दिला.
अशा या भारत मातेच्या महान सुपुत्राच्या या उडीला यावर्षी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. वाळवा तालुक्यातीलही अनेक मान्यवर आपली ही जबाबदारी समजून सातारा येथे १० सप्टेंबरला उपस्थित राहणार आहेत असे सांगून, या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी वैभव नायकवडी यांनी केले.
Satara Jail, Krantiveer Dr. Nagnathanna Naikawadi
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या