माण, खटाव व फलटण तालुक्यात ४२ गावे आणि २७५ वाड्यांना ३९ टँकरद्वारे पाणी
Satara News : पावसाने पाठ फिरवल्यामुळे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून त्याखालोखाल खटाव आणि फलटण तालुकेही दुष्काळाने होरपळून गेले आहेत. या तीनही तालुक्यातील ४२ गावे आणि २७५ वाड्यांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
या तीन तालुक्यात एकूण ६३ हजार ९९० लोकसंख्या टंचाईने बाधित झाली असून ५३ हजार ८०७ पशुधनही संकटात सापडले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या एकूण ३९ टँकर सुरू करण्यात आले असून यामध्ये १ शासकीय आणि ३८ खाजगी टँकरचा समावेश आहे. माण तालुक्यातील ३५ गावे आणि २३९ वाड्यांतील ५६ हजार १५७ लोकसंख्येसाठी ३५ टँकर सुरू आहेत.
संवेदनशील कामाची अपेक्षा
खटाव तालुक्यात ७ गावे आणि ३६ वाड्यांतील ७ हजार ८३३ लोकसंख्येला ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच फलटण तालुक्यात ३ गावे आणि ४ वाड्यांतील २ हजार २२२ लोकसंख्या बाधित असून तेथे ३ टँकर मंजूर करण्यात आले आहेत. दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलपणे काम करावे अशी अपेक्षा दुष्काळी भागातील जनता व्यक्त करत आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या