Satara News : ...तर प्रतिकात्मक शिल्प बसवून


हिंदुत्ववादी संघटनांची साताऱ्यात निदर्शने; शिवप्रताप दिनाची दिली डेडलाईन

Satara News : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझलखानाच्या थडग्यासमोर बसवण्यासाठी सरकारने तयार केलेले अफझलखान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प ताबडतोब बसवावे या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. हे शिल्प न बसवल्यास १६ डिसेंबर रोजी शिवप्रताप दिनी प्रतिकात्मक शिल्प हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत बसवू असा इशारा यावेळी देण्यात आला.

श्री शिवप्रताप भूमी मुक्ति आंदोलन, हिंदू एकता आंदोलन, रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदू जनजागृती आदी संघटनांनी हे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पुन्हा उदात्तीकरण होऊ नये 

अफझलखान वधाचे शिवप्रतापाचे शिल्प बनवून मूर्तिकाराच्या स्टुडिओमध्ये गेली अडीच वर्ष तयार आहे. अफझलखानाच्या थडग्याजवळ हे शिल्प बसवण्याची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत. जेणेकरून पुन्हा अफझलखानाच्या थडग्याचे उदात्तीकरण होणार नाही. हे शिल्प बसवण्यासाठी सरकार विलंब का लावत आहे ? सरकार जाणूनबुजून टाळाटाळ करत आहे का ? असे सवाल हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी यावेळी बोलताना केला.

यावेळी अस्मिता लाड, नगरसेवक सागर पावशे, संतोष शेंडे, अभिजीत बारटक्के, सुहास काशीद, विजय गाडवे, संतोष शिंदे, राजू शेडगे, विनय भिसे, सोमनाथ गोटखिंडे,अनिरुद्ध कुंभार, प्रदीप निकम, बाळासाहेब मोहिते, रवींद्र वादवणे, भूषण गुरव, राम काळे, गजानन माने, गजानन मोरे, प्रेम देसाई, मनोज साळुंखे, शिवाजी पाटील, नितीन बोरावत, आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवभक्त उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या