Satara News : सातारा-आसनगाव बससेवेचा बोऱ्या


प्रवाशांची गैरसोय थांबवा; राष्ट्रवादी युवकचे विभाग नियंत्रकांना निवेदन

Satara News : सातारच्या ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी अत्यंत उपयोगाची असलेल्या सातारा-आसनगाव एसटी बस सेवेचा गेल्या तीन-चार महिन्यांपासून बोऱ्या वाजला असून त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही बस सेवा नियमित सुरू राहावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष समीर घाटगे यांनी केली आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभाग नियंत्रकांना घाटगे यांनी यासंदर्भात नुकतेच निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे, की आसनगाव तसेच परिसरातील नागरिक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सातारा-आसनगाव ही बस अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ही बस सेवा नियमित वेळापत्रकानुसार चालविली जात नसून काही फेऱ्या वारंवार रद्द केल्या जात आहेत. विशेषतः दर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आसनगाव बस सेवा बंद ठेवून ही बस पुणे मार्गावर सोडली जाते. तसेच काही वेळा मुक्कामी बस फेरी देखील रद्द केली जाते. त्यामुळे आसनगाव व परिसरातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात

आसनगाव एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असून, बस सेवा नियमित उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात जाण्यास तसेच नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी प्रवास करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सातारा - आसनगाव एसटी बस सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू ठेवावी, रद्द करण्यात येणाऱ्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात तसेच दिवसातून एक अतिरिक्त बसफेरी सुरू करण्यात यावी. रविवारच्या दिवशी देखील प्रवाशांना नियमित बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी व मुक्कामी बस फेरी नियमित ठेवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी संतोष पवार, तेजस जाधव, आशिकेश घोरपडे, किरण पाटील, तेजस पवार, ऋषिकेश पोतदार, निखिल गायकवाड आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या