Satara News : दहिवडी पोलिसांकडून गुन्हे उघड


ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने तिघांना पकडले; दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

Satara News : सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेले घरफोडी व चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी माण तालुक्यातील मार्डी येथील तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

विशाल राजेंद्र चव्हाण, अविनाश कुंडलीक चव्हाण, रोहित हणमंत चव्हाण अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. मागील काही दिवसापासून दहिवडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मार्डी, आंधळी येथे शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. त्यावरुन दहिवडी पोलीस ठाण्याकडील गुन्हे अन्वेषण पथक तसेच शिंगणापूर दूरक्षेत्राचे अंमलदार आरोपीचा शोध घेत होते.

संशयितांकडून गुन्ह्यांची कबुली

दरम्यान, संशयित आरोपींसंदर्भात गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने संशयीत आरोपी विशाल चव्हाण, अविनाश चव्हाण, रोहित चव्हाण ताब्यात घेवून चौकशी केली असता मार्डी येथील पोळ, ढवळे, जळक यांचे तसेच बोडके येथील गोरे यांची पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. तसेच विशाल चव्हाण व त्याचा विधीसंघर्ष मित्र यांनी मार्डी येथील राजमाने यांच्या घरी कोणी नसताना त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरी केल्याचे त्याचप्रमाणे मार्डी येथीलच चव्हाण यांच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलची चोरी केल्याचे सांगितले. आरोपींना या गुन्ह्यांमध्ये अटक करुन त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सर्व पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार, दागिने, गहू, मोटारसायकल असा एकुण २ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, संतोष विरकर, महेश सोनवलकर, सुधीर करचे यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे, प्रकाश हांगे करीत आहेत.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या