Satara News : अजिंक्यतारा कारखान्यास राष्ट्रीय पुरस्कार


'हाय्येस्ट' साखर उताऱ्याबद्दल जाहीर; २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत पुरस्कार वितरण

Satara News : नॅशनल फेडरेशन (नवी दिल्ली) या देशस्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून शेंद्रे (ता. सातारा) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सन २०२५ - २६ गळीत हंगामासाठी 'हाय्येस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे २०२५-२६ चा हंगाम आव्हानात्मक असतानाही कारखान्याची कामगिरी उल्लेखनीय ठरल्याचे संघाने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. 

हा पुरस्कार केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दि. २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित सोहळयात वितरण केला जाणार आहे. आतापर्यंत अजिंक्यतारा कारखान्यास तांत्रिक गुणवत्ता, कार्यक्षमता व अत्युत्तम उत्पादन क्षमतेच्या आधारे देशस्तरावरून व राज्यस्तरावरून एकूण ३२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुरस्कारामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

यशस्वीतेची परंपरा कायम ठेवू

संचालक मंडळामार्फत काटकसरीचे धोरण अवलंबून सभासदाभिमूख कारभार करण्यात येत असून, पारदर्शक कारभारामुळे व कारखान्याचे उत्कृष्ट व काटेकोर आर्थिक नियोजन, खर्चात असलेली काटकसर व सर्वांकडून मिळत असलेले बहुमोल सहकार्य यामुळे कारखाना प्रगतीपथावर नेण्यास वाव मिळत आहे. सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रेरणेने कारखान्याची उभारणी झाली असून त्यांनी दाखवून दिलेल्या विकासवाटेने आपण मार्गक्रमण करीत आहोत. त्यांच्या आशीर्वादाने भविष्यातील विविध आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाऊन यशस्वीतेची परंपरा कायम ठेवू असा विश्वास कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

यावेळी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. सभासद, बिगर सभासदांनी या गाळप हंगामाकरीता कारखान्याकडे नोंद केलेला सर्वच्या सर्व ऊस आपल्याच कारखान्याकडे गळितास देण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या