पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा - उदयनराजे
Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज पहिला दिवस होता. हा अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून उदयनराजे यांनी गृहनिर्माण संस्था व दूध उत्पादक संस्था मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली.
जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हितासाठी ही बँक टिकली पाहिजे व मजबूत राहिली पाहिजे. त्यासाठी राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा असे आवाहन त्यांनी सर्वपक्षीय नेते मंडळींना केले आहे.
निवडणूक बिनविरोध की अटीतटीने ?
जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की अटीतटीची होणार हे लवकरच स्पष्ट होईल. गेल्या काही वर्षात बँकेवर राष्ट्रवादीचीच सत्ता राहिली आहे. मात्र आता बँक ताब्यात घेण्याचा भाजपचा इरादा आहे. दृष्टीने आधीपासूनच भाजपने पावले टाकली असून सोसायट्यांच्या ठरावापासून याची चुणूक दिसली आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या