२५ सुपरकार्सचा ताफा साताऱ्यात; सुपर कार रुट ग्रुपकडून रॅलीचे आयोजन
Satara News : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठाराच्या 'लक्झुरिअस टुरिझम'साठी २५ सुपरकार्सचा ताफा साताऱ्यात दाखल झाला आहे. द सुपर कार रुट ग्रुपने या कार रॅलीचे आयोजन केले आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ झाला.
खासदार उदयनराजे भोसले यांना सुपरफास्ट कारचे वेड आहे. फॉर्मुला वन सुपर रेसिंग कार कॉम्पिटिशनमध्ये देखील त्यांची निवड झाली होती. हा धागा पकडून मुंबईहून थेट खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेण्यासाठी २५ सुपरकार्स आज उदयनराजे यांच्या जलमंदिर या निवासस्थानी दाखल झाल्या. उदयनराजे यांनी सुपर कार्स ओनरसोबत गप्पा देखील मारल्या.
कॉलेजच्या दिवसात गेलो की काय ?
ही कार रॅली म्हणजे एक प्रकारे कास पर्यटनाचा प्रमोशनचा भाग आहे. या संपूर्ण मित्रमंडळींबद्दल आणि त्यांच्या गाड्यांबद्दल बऱ्याच दिवसांपासून मी ऐकले होते. मी कॉलेजच्या दिवसात गेलो की काय असे थोड्या वेळासाठी मला वाटले अशी मिष्कील टिप्पणी उदयनराजे यांनी यावेळी केली.
Chhatrapati Udayanraje Bhosale, Member of Parliament from Satara, Super Car
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या