Satara Wildlife News : कासव तस्करांना खिंडीत पकडले


दोन अल्पवयीनांसह चौघे ताब्यात; सातारा तालुका पोलिसांची कारवाई

Satara Wildlife News : कासवाची तस्करी करणाऱ्या चार संशयितांना सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने लिंब खिंड परिसरात सापळा रचून पकडले. प्रज्वल विजय सावंत (वय २१, रा. खोकडवाडी, ता. जि. सातारा), केतन विनोद जाधव (वय २१,  गोवे, ता. जि. सातारा) व दोन विधीसंघर्षग्रस्त बालक अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस हवालदार राजू शिखरे यांना लिंब खिड परिसरामध्ये चार इसम तस्करी केलेल्या कासवाची विक्री करण्यास येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाल्यामुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील, पोलीस हवालदार राजू शिखरे, मनोज गायकवाड, पोलीस शिपाई संदीप पांडव यांनी कासव विक्री करण्यास येणाऱ्या इसमांची माहिती काढून लिंब खिंड परिसरामध्ये सापळा रचला. त्या ठिकाणी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक काळपट रंगाचे इंडियन सॉफ्टसेल टर्टल जातीचे कासव व दोन मोटर सायकली असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 

कोठून व कोणासाठी आणले ?

संशयितांनी कासव कोठून आणले व कोणास विक्री करणार होते याबाबत तपास सुरू आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सी. एस. पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, चंद्रहार पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, पोलीस अंमलदार, पोलीस हवालदार राजु शिखरे, मनोज गायकवाड, संदीप आवळे, सतिष बाबर, दादा स्वामी, पंकज ढाणे, पो. शि संदीप पांडव, सुनिल भोसले, सचिन झणकर यांनी केली आहे.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या