गणेशोत्सव काळासाठी हद्दपार; धडक कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ
Shirwal Crime News : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरवळ पोलीस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, सार्वजनिक शांतता कायम ठेवणे यासाठी तब्बल ३४ जणांना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.
हद्दपारीची कारवाई झालेल्यांमध्ये रितेश दिलीप किर्वे, मनोज पांडुरंग पवार, अनिकेत राजेंद्र कांबळे, अनिल उर्फ पाप्या शामराव वाडेकर, सोमनाथ उर्फ माऊली शंकर राऊत, सुनिकेत संतोष माने, पारस विश्वास भोसले, बाळा भानुदास मंजुळे, रियाज उर्फ मिन्या इकबाल शेख, अय्याज इकबाल शेख, ओंकार राजेंद्र कांबळे, अविष्कार विलास कांबळे, अर्जुन उर्फ अविनाश सतीश पिसाळ, ओंकार दत्तात्रय क्षीरसागर, शुभम उर्फ सोन्या रमेश पंडित, शाहरुख ईस्माईल पठाण, विजय उर्फ शामा बापू पाचे, योगेश गुलाब शिवतरे, वैभव राजू भरगुडे, वेदांत जितेंद्र जाधव, रॉकी हरिदास बाला, करण दत्तात्रय महांगरे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक, हृषीकेश उर्फ लंब्या विजय रणवरे, अहमद रजा अमीर भालदार, यश विलास कबुले, अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे, इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी, शेखर शिवाजी नेवसे, रोहित सुभाष सुर्वे, पंकज मोहन वीर, योगेश धर्मराज बामणे यांचा समावेश आहे.
व्यक्तींच्या हालचाली, उपस्थिती अथवा कृतीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन दखलपात्र गंभीर अपराध घडण्याची तसेच गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी शिरवळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर असणाऱ्या या ३४ व्यक्तींना गणेशोत्सव काळात हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव खंडाळा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी रविराज जाधव यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार जाधव यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे.
गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग
तहसीलदार रविराज जाधव यांनी संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. यामध्ये बेकायदेशीर हत्यार वापरणे, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे, धमकी देणे, मारहाण करणे, बेकायदेशीर घरात घुसणे, मालमत्तेचे नुकसान करणे, शिवीगाळ, चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, जबरी चोरीसह दुखापत, जातीवाचक भाष्य, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर अतिक्रमण यासारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


0 टिप्पण्या