Mumbai News : ‘सज्ज आहेत माझे हात’चा विश्वविक्रम


तब्बल ६१ हजार २२१ जणांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ

Mumbai News : नुकत्‍याच राबविलेल्या ‘सज्ज आहेत माझे हात’ या सीपीआर जनजागृती मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १२० हून अधिक शाळा, महाविद्यालये, संस्था व कार्यस्थळांतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि नागरिकांसह तब्बल ६१ हजार २२१ जणांनी सीपीआर शिकण्याची शपथ घेतली. 

अपोलो हॉस्पिटल्सने राबविलेल्‍या या मोहिमेच्‍या विक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने ‘एका महिन्यात सीपीआर शिकण्याचा सर्वाधिक संकल्प’ म्हणून अधिकृत नोंद केली. कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. प्रीथा रेड्डी यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा झाला. वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी डॉक्टरांची मदत मिळेपर्यंत सामान्य नागरिकांनी तत्परतेने मदत करावी, हा मोहिमेचा उद्देश होता.

कृतज्ञतेचा सर्वात चांगला मार्ग

कार्यकारी उपाध्यक्षा डॉ. प्रीथा रेड्डी म्हणाल्या, ६१ हजारहून अधिक लोक आज दुसऱ्याला मदत करण्यासाठी पुढे येण्यास सज्ज झाले आहेत. यामुळे एकजुटीची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. याच प्रेरणेतून ‘सज्ज आहेत माझे हात’ या चळवळीचा जन्म झाला आहे, एक अशी चळवळ जी देशभरातील सामान्य नागरिकांच्या हातात जीवन वाचवण्याचे ज्ञान देण्याचा प्रयत्न करते. नवी मुंबईने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे आणखी लाखो हातांना जीवन वाचवण्यासाठी तयार करणे होय!

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या