Nana Patekar News : ‘बोल संज्या, काय म्हणतोस?’... रडू येतंय

शाळा व शाळेतील विविध उपक्रमांविषयी अभिनेते नाना पाटेकर यांना माहिती देताना संजय पाटील.

अभिनेते नाना पाटेकर यांच्या आठवणी जागवताना संजय पाटील झाले भावूक 

Nana Patekar News : ‘बोल संज्या, काय म्हणतोस?’ असा आवाज आता परत कधीच ऐकू येणार नाही या कल्पनेनं सकाळपासून रडू येतंय, अशी भावुक प्रतिक्रिया अभिनेते नाना पाटेकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या निवृत्त उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी व्यक्त केली.

संजय पाटील हे सातारला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. याशिवाय त्यांनी ईश्वरपूर, मंचर, मावळ अशा विविध ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. सातारचे माजी लोकप्रिय जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांचे ते लहान बंधू होत. आज सकाळी नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाची बातमी समजल्यावर त्यांना धक्का बसला. त्यांच्या आठवणींनी पाटील यांचा कंठ दाटून आला. 

नाना म्हणजे जिंदादील माणूस

नाना पाटेकर यांच्या आठवणी जागवताना ते म्हणाले, 'नाना म्हणजे जिंदादील माणूस. माझ्या गावच्या शाळेला १५० वर्ष पूर्ण झाली म्हणून संपूर्ण शाळेचं नूतनीकरण करुन त्यांना त्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. मुंबईवरून कालकुंद्री या चंदगड तालुक्यातील एकदम कोपऱ्यातील गावात ते आले होते. जिथं काही विधायक चालले असेल तिथल्या कामांविषयी त्यांना आपुलकी, प्रेम होतं. त्याच दिवशी प्रचंड पाऊस झाला होता आणि रस्त्यावर अनेक झाडं पडली होती. पण त्यातूनही मार्ग काढत ते गावी आले. आल्यावर त्यांनी कार्यक्रमाची सगळी सूत्रं ताब्यात घेऊन कार्यक्रम सजवला. एका वयोवृद्ध शिक्षकाचा सत्कार करायचा होता. त्यांना स्टेजवर येता येत नव्हतं. नाना स्वतः खाली उतरले. त्यांच्या पाया पडून स्टेजच्या खालीच त्यांचा सत्कार केला.' 

फोन केल्यावर ‘बोल संज्या, काय म्हणतोस?’ असा आवाज आता परत कधीच ऐकू येणार नाही या कल्पनेनं सकाळपासून रडू येतंय असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.

Nana Patekar, Subrav Patil, Makarand Anaspure, Kolhapur, Chandgad

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या