शेपिंग ह्यूमन कॅपिटल जर्नी टुवर्ड्स भारत @ १००' विषयावर होणार विचारमंथन
Satara News : मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध क्षेत्रातील व्यावसायिकांची सर्वोच्च राष्ट्रीय संस्था असणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट एनआयपीएम सह्याद्री सातारा चॅप्टरच्या वतीने शनिवारी (दि. १०) सातारा येथे 'पश्चिम विभागीय एकदिवसीय परिषद' आयोजित करण्यात आली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात ही परिषद होणार असून त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधून विविध उद्योगांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एचआर व ईआर क्षेत्रातील मान्यवर अधिकारी, नामवंत प्राध्यापक आणि व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी मिळून ७०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. परिषदेत 'एचआर कॅलिडोस्कोप : शेपिंग ह्यूमन कॅपिटल जर्नी टुवर्ड्स भारत @ १००' या विषयावर सखोल विचारमंथन करण्यात येणार आहे.
तंत्रज्ञान आणि मानवी प्रतिभा
देश स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करत असताना व्यावसायिक नेतृत्व, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मानवी प्रतिभा यांचा समन्वय साधणारा एक दूरगामी आराखडा तयार करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये करारो इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. बालाजी गोपालन, मॅथर अँड प्लॅटचे मॅनेजिंग डायरेक्टर हेमंत वाटवे तसेच एसीजी वर्ल्ड लिमिटेडचे ग्रुप सीईओ निखिल कुलकर्णी यांच्यासारखे कॉर्पोरेट क्षेत्रातील आघाडीचे उद्योगपती व व्यवस्थापकीय संचालक मार्गदर्शन करणार आहेत.
परिषदेत चार प्रमुख अभ्यासपूर्ण सत्रांच्या माध्यमातून पॅनल डिस्कशन्स, हाय-इम्पॅक्ट प्रेझेंटेशन्स आणि मुख्य व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर, नव्या युगातील जेन-झी कर्मचाऱ्यांच्या आकांक्षा व कार्यसंस्कृती, 'विकसित भारत' घडवण्यासाठी सक्षम एचआर नेतृत्व आणि नवीन लेबर कोड व इंडस्ट्रियल रिलेशन्स २.० यासारख्या समकालीन आव्हानांवर मंथन होणार आहे. या परिषदेच्या समारोप समारंभासाठी विशेष अतिथी म्हणून कूपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर उपस्थित राहणार आहेत.
परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन
पश्चिम महाराष्ट्रातील मानव संसाधन व्यावसायिक, प्लांट हेड्स, एम्प्लॉई रिलेशन्स मॅनेजर्स, उद्योजक तसेच व्यवस्थापन विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिषदेचे संयोजक व कूपर कॉर्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी डॉ. नितीन देशपांडे तसेच एनआयपीएम सह्याद्री सातारा चॅप्टरचे अध्यक्ष व विप्रो पारि चे ग्लोबल आयआर हेड डॉ. उदय भोसले यांनी केले आहे.
National Institute Of Personnel Management Sahyadri Satara Chapter, Western regional conference 2026
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या