Satara News : कोरेगावातील घरफोडीचा ४ दिवसात तपास


सातारा शहरात आरोपी सापडला; साडेपाच लाखाचे दागिने हस्तगत

Satara News : कोरेगावातील महादेवनगरमध्ये चार दिवसांपूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उकल केली असून याप्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीला गेलेला सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचा चार तोळ्याचा सोन्याचा दागिना पोलिसांनी हस्तगत केला आहे. तुषार प्रमोद सुतार (वय ३१, रा. महादेवनगर कोरेगांव, ता. कोरेगांव, जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक स्थापन केले होते. दरम्यान, दि. ३ ते ४ ऑक्टोबर दरम्यान कोरेगावातील महादेवनगरात झालेली घरपोडी महादेवनगर येथील तुषार सुतार याने केली असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना खास बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीस अनुसरून स्थानिक गुन्हे शाखेने तुषार सुतारला सातारा शहरात ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने घरफोडी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला सोन्याचा दागिना हस्तगत करण्यात आला आहे. 

कारवाईत यांचा सहभाग

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, अतुल जगदाळे, पोलीस अंमलदार इसाक मुलाणी, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, प्रमोद सावंत, राजू कांबळे, अमीत माने, शिवाजी भिसे, अरूण पाटील, शकुंतला सणस, तसेच कोरेगांव पोलीस ठाणेकडील पोलीस अंमलदार राहुल कुंभार, समाधान शेडगे, गणेश शेळके यांनी या कारवाईत सहभाग घेतला. 

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या