Satara News : डॉ. बसवेश्वर चेणगे सातारा आकाशवाणीवर


'चिंतन' कार्यक्रमातून रविवारपासून दररोज सकाळी जीवनमूल्यांवर मुक्तचिंतन

Satara News : सातारा जिल्ह्यातील मसूर येथील ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. बसवेश्वर चेणगे यांचे विचार सातारा आकाशवाणी केंद्राच्या 'चिंतन' या कार्यक्रमातून दि. १ ते ३० नोव्हेंबर या महिनाभरात ऐकता येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण दररोज सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी सातारा आकाशवाणीवरून होणार आहे.

डॉ. चेणगे हे गेली तीन दशके मराठी भाषेच्या जतन व संवर्धनासाठी कार्यरत असून महाराष्ट्र, गोवा व सीमा भागात साहित्य चळवळीतील तळमळीचे कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांच्या पुढाकाराने या तिन्ही राज्यात गेली बावीस वर्षे गुंफण साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. त्यांची विविध विषयावर आठ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातील काही पुस्तकांची निवड राज्य शासनाच्या ग्रंथ निवड समितीने केली आहे. 

प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी

त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी सातारा आकाशवाणीच्या 'चिंतन' कार्यक्रमातून श्रोत्यांना मिळणार आहे. 'जीवनमूल्ये' या विचार सूत्रावर हा कार्यक्रम असणार आहे. 

Satara Akashwani, Satara FM, All India radio Satara

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या