शुद्धलेखनातील जाणकार व्यक्तिमत्व हरपले; संगम माहुली येथे अंत्यसंस्कार
Satara News : सातारा येथील गार्डन सिटीमधील रहिवासी ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक, ग्रंथ वितरक व मुद्रितशोधक विकास मोरेश्वर धुळेकर (वय ६७) यांचे रविवारी पहाटे अल्प आजाराने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर संगम माहुली (सातारा) येथे कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन भाऊ, भावजया, पुतणे असा परिवार आहे.
विकास धुळेकर गेली जवळपास पस्तीस वर्षे दैनिक ऐक्यमध्ये मुद्रितशोधक म्हणून कार्यरत होते. तसेच ऐक्यमध्ये त्यांनी विवेकसिंधू, गुंजारव सदरात सातत्याने लेखन केले होते. मराठी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्याचप्रमाणे मराठी व्याकरणाचा त्यांचा मोठा व्यासंग होता. ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्यासह अनेक नामवंत लेखकांच्या पुस्तकांचे मुद्रितशोधन धुळेकर यांनी केले होते. सातारा जिल्ह्यातील प्रमुख पुस्तक वितरकांमध्ये त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. गुंफणच्या साहित्य चळवळीत ते कित्येक वर्षांपासून हिरीरीने सहभागी होत असत.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
गेले आठवडाभर सातारा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज पहाटे त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर संगम माऊली सातारा येथे कैलास स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, बाबुराव शिंदे, डॉ. बसवेश्वर चेणगे, सुरेश चिंचकर, लोकायत प्रकाशनाचे राकेश साळुंखे, सुधीर देशपांडे यांच्यासह साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
रक्षा विसर्जन विधी मंगळवारी
विकास धुळेकर यांचा रक्षा विसर्जन विधी मंगळवारी, दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता संगम माहुली येथे कैलास स्मशानभूमीत होणार आहे.
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

0 टिप्पण्या