Satara News : जिल्ह्यात रूग्णवाढीचा आलेख उंचावला; १८ दगावले


चोवीस तासात १००५ बाधित; पॉझिटिव्हिटी रेटही गेला १० च्या भोंज्यापर्यंत

Satara News : ‘सातारा अपडेटस्’ने वर्तवलेल्या अनुमानानुसार जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भावही वाढला आहे आणि पॉझिटिव्हिटी रेटही १० च्या भोंज्यापर्यंत गेला आहे. ही जिल्हावासीयांसाठी धोक्याची घंटा आहे. काल रात्री १२ वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार १००५ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात ५११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या वाढून साडेनऊ हजारांजवळ गेली आहे.

मागील आठवड्यात सरासरी ७०० ते ८०० च्या दरम्यान आलेली रोजची रूग्णवाढ आज हजारांवर गेली आहे. तसेच ७ पर्यंत घसरलेला पॉझिटिव्हिटी रेट आता दहाच्या दारात पोहोचला आहे. त्याने दहाचा उंबरठा ओलांडला तर जिल्हा पुन्हा चौथ्या स्तरात जाईल व जिल्ह्याचे निर्बंध पुन्हा कडक होण्याची टांगती तलवार आहे. रूग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट ज्या झपाट्याने खाली आला होता, त्या गतीला मागील आठवड्यात निर्बंध शिथिल झाल्यापासून खीळ बसली होती आणि आता तो आलेख उंचावायला लागला की काय अशी धास्ती जनतेत निर्माण झाली आहे.

बाधितांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली २५ (८४६५), कराड २४६ (२६९०४), खंडाळा ३८ (११६८५), खटाव १५८ (१९२८९), कोरेगाव ७३(१६५५९), माण ५६ (१३०५९), महाबळेश्वर २० (४२४५), पाटण ३७ (८३१८), फलटण ६९ (२८१९२), सातारा २२४ (३९८९३), वाई ४४ (१२५६३) व इतर ५ (१२९०) याप्रमाणे आजअखेर एकूण १ लाख ९० हजार ४६२ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

मृतांची आजची व कंसात आजअखेरची संख्या

जावली १ (१९२), कराड ८ (७९४), खंडाळा ० (१४९), खटाव १ (४७९), कोरेगाव ० (३८०), माण १ (२५६), महाबळेश्वर १ (४५), पाटण १ (१९४), फलटण ० (२८०), सातारा ४ (१२२२), वाई १ (३३०) याप्रमाणे आजअखेर जिल्ह्यात एकूण ४३२१ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा जिल्हा कोरोना

  • एकूण नमुने - १०४२७१४
  • एकूण बाधित - १९०४६२
  • घरी सोडण्यात आलेले - १७७७०५
  • मृत्यू - ४३२१
  • उपचारार्थ रुग्ण - ९४५१

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या